पोस्ट्स

......आणि पाय दिसला...

🤣 आणि पाय दिसला🤣 साधारणतः १९९३ - ९४ सालचा प्रसंग असेल मी व माझा मित्र अरुण आम्ही दोघेही एका नामांकित शिक्षण संस्थेत बिनपगारी शिक्षक म्हणून रुजू झालेलो होतो. मी ढवळे हादगाव येथे तर तो आष्टी ला कार्यरत होतो. नुकतेच आमचे शिक्षण पूर्ण झालेले होते , दोघेही अतिशय आनंदात व्यवस्थेच्या राक्षसासोबत परिस्थितीच्या रेट्याणे जीवन जगण्याचा संघर्ष लढत होतो.आम्ही दोघेही एकाच कॉलनीत म्हणजे जायकवाडी वसाहतीत राहत होतो.आजही मी तिथेच राहतोय , अरुण मात्र आता बदली झाल्याने दुसरी कडे राहण्यास गेला. त्या काळी आमच्या कॉलनीत खुप कर्मचारी राहत होते त्यात ईन्जिनियर , क्लार्क , चौकीदार , कणॉलईन्सपेक्टर , सेवक ई.पदावर काम करणारी लोकं होती.सर्वच्या सर्व घरे लोकांनी तुडुंब भरलेली विविध जाती धर्माची , पंथाची ही लोकं त्यांच्या वेगवेगळ्या खोडिणे, स्वभावाने जगण्याची मजा वाढवायचे...          त्या काळी आमच्या कॉलनीच्या मागे अजून एका कॉलनीचे बांधकाम पूर्ण होऊन त्या ठिकाणी बरेचसे कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह राहण्यास आलेले होते.या कॉलनीच्या एकदम समोर व आमच्या कॉलनीच्या शेवटी अरुणचे घर होते...कॉलनीतील सर्वजण एकमेकांना चांगले