......आणि पाय दिसला...
🤣 आणि पाय दिसला🤣
साधारणतः १९९३ - ९४ सालचा प्रसंग असेल मी व माझा मित्र अरुण आम्ही दोघेही एका नामांकित शिक्षण संस्थेत बिनपगारी शिक्षक म्हणून रुजू झालेलो होतो. मी ढवळे हादगाव येथे तर तो आष्टी ला कार्यरत होतो. नुकतेच आमचे शिक्षण पूर्ण झालेले होते , दोघेही अतिशय आनंदात व्यवस्थेच्या राक्षसासोबत परिस्थितीच्या रेट्याणे जीवन जगण्याचा संघर्ष लढत होतो.आम्ही दोघेही एकाच कॉलनीत म्हणजे जायकवाडी वसाहतीत राहत होतो.आजही मी तिथेच राहतोय , अरुण मात्र आता बदली झाल्याने दुसरी कडे राहण्यास गेला. त्या काळी आमच्या कॉलनीत खुप कर्मचारी राहत होते त्यात ईन्जिनियर , क्लार्क , चौकीदार , कणॉलईन्सपेक्टर , सेवक ई.पदावर काम करणारी लोकं होती.सर्वच्या सर्व घरे लोकांनी तुडुंब भरलेली विविध जाती धर्माची , पंथाची ही लोकं त्यांच्या वेगवेगळ्या खोडिणे, स्वभावाने जगण्याची मजा वाढवायचे...
त्या काळी आमच्या कॉलनीच्या मागे अजून एका कॉलनीचे बांधकाम पूर्ण होऊन त्या ठिकाणी बरेचसे कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह राहण्यास आलेले होते.या कॉलनीच्या एकदम समोर व आमच्या कॉलनीच्या शेवटी अरुणचे घर होते...कॉलनीतील सर्वजण एकमेकांना चांगले ओळखायचे व एकमेकांच्या अडीअडचणीत सुखदुःखात एकमेकांना मदतही करायचे.तर त्या नवीन झालेल्या कॉलनीस आम्ही वरचा कँम्प असं नाव दिलं होतं...
आष्टी पासुन एक किलोमीटर लांब वसाहत असल्याने आम्हांला भुरट्या चोरांच्या चोरीचा तर कधी लहान मोठ्या दरोड्याचा ही सामना करावा लागायचा. याच वसाहतीमधे काही क्वॉर्टर्स पोलिसांची देखील होती, आजही आहेत. सर्व पोलिस त्यांच्या कुटुंबासह या वसाहतीत राहायचे, त्यांचा त्या काळी खुप सहारा वाटायचा पण खरं सांगायचं म्हणाल तर पोलिस कर्मचारी कॉलनीत राहायला आल्या पासूनच चोरीचे प्रमाण वाढलं होतं...बरे असो अश्या आमच्या कॉलनीत त्या काळी एक कर्मचारी राहण्यास आले. ईतर कर्मचाऱ्यांप्रमाणे तेही थोड्याच कालावधीत कॉलनीतील एक कुटुंबाचे सदस्य होऊन गेले.पण त्यांची एक खोड आख्या कॉलनीत कुजबुजीचे व चर्चेचे कारण ठरली व हळू हळू त्याची चर्चा कॉलनीतील सर्व बाया - बापे , पोरं - सोर त्याच खोडीची चर्चा सकाळी हापश्यावर तर सायंकाळी कट्ट्यावर करत होती.तर ती चर्चा होती अशी की ते जे कर्मचारी होते आम्ही त्यांना ' 'काका' म्हणायचो त्या काकांना एक खोड होती ती म्हणजे ते त्यांचे पाय कधीच दिसू देत नव्हते , म्हणजे हापश्यावर पाणी भरायला आले तरी त्यांची लुंगी एकदम जमीनीवर लोळत असायची एदाकदाचीत वाऱ्याचा झोत आल्यास लुंगी थोडी उडालीतर सगळे जण लगेच त्यांच्या पाया कडे बघायचे तर एक जाड - जुड़ काळा बुट त्यांनी घातलेले असायचे , त्यावर जाड - जुड़ काळ्यारंगाचा मोजा ( सॉक्स ) घातलेला असायचा. मुलाला सायकल वर बसवून जेंव्हा ते शाळेत सोडायला यायचे तेंव्हा त्यांची पँट अमिताभ साहेबांसारखी मोठ्या बेलबॉटम ची असायची.हे काका त्यांचे पाय का दिसू देत नाही...?? हा प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी असायचा जसा आता "कोरोणा"चा रोगी कोणाला कसा दिसत नाही...??? तसा पाय का दाखवीत नाही...??? हा कॉलनीपुरता राष्ट्रीय प्रश्न झाला होता त्या काळी. बरे असो , बरं हे आमचे काका देवळात आले तरी पायातील सॉक्स घालूनच देवदर्शन करायचे.लहान मुलं त्यांच्या घरी काहीही निमित्त करून पाय पाहण्यासाठी जायचे तेंव्हा देखील ते घरी सुद्धा पायमोजे म्हणजे सॉक्स घालूनच राहायचे. वर्ष दीड वर्ष कॉलनीत त्यांच्या पायावरूण वेगवेगळ्या अफवा आणि तर्कवीतर्क यांस तुफान उधाण आले होते , मी आणि अरुण त्यात सामील होतोच , रिकाम्या वेळी सर्व जण आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार अंदाज लावायचे. तसे आमचे हे काका आमच्या घराच्या पुढच्या भागी म्हणजे सध्या सिद्धेश्वर शाळेला जाण्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी राहचे आणि स्वभावाने ठीक - ठाक म्हणजे कोणत्याही सार्वजनिक कार्यात त्यांचा हिरहीरीने सहभाग असायचा. फक्त तेंव्हाच्या वर्षाच्या कालावधीत कोणी त्यांना त्यांच्या २४ तास १२ महिने पाय झाकून घेण्या मागच्या सिक्रेट बद्दल कोणी विचारायचे धाडस केलेले नव्हते. का केले नव्हते हे मात्र काही सांगता येणार नाही.
त्यासाली खुप थंडी पडली होती नुकतीच दिवाळी होऊन गेलेली होती , बरेच कर्मचारी गावी गेलेले होते तर काही दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कॉलनीत आपआपल्या कुटुंबासह राहायला आलेले होते. त्या दिवशी रात्रीच्या साधारणतः २ ते २ : ३० च्या दरम्यान खुप मोठा गलका , गोंगाट आणि धावा , धावा...चोर ...चोर असा आवाज येत होता.कॉलनीचे रखवालदार मोठमोठ्याने आवाज देत होते.मी घराच्या व्हरांड्यातच झोपलेलो होतो आणि आवाज आल्या बरोबर उठलो हातात टॉर्च ( दोन किंवा तीन सेलचा त्याकाळी घरोघरी असायचा, एव्हरेडीचा ) दारा मागची काठी घेतली. आई म्हणाली जपून जा , जास्त पुढं जाऊ नको, चोर बेदम मारतात. मी म्हणालो ठीक , आणि दरवाजा उघडून बाहेर आलो, आणि आंगनात उभे राहून आवाज कुठून येतोय याचा कानोसा घेत होतो. तेव्हढ्यात या "काकांनी" मला आवाज दिला.मला म्हणाले मनोज लवकर चल वरच्या कॉलनीत दरोडा पडलाय खुप चोर आहेत आणि त्यांनी पोलिसाचेच घर फोडलय..., मी म्हणालो बरं , आणि त्यांच्या मागे मागे सावधपणे चालायला सुरुवात केली. वरच्या कॉलनीकडे जाताना आमचा मित्र अरुणराव चे घर होतं मी त्याला आवाज दिला तो तयारीतच होता , आवाज दिल्या - दिल्या लगेच माझ्या मागन आला.कारण आमची दोस्ती तेव्हाहि आणि आताही जय - वीरु सारखी आहे. आमचे "काका" पुढं त्यांच्या माग अरुण आणि मी त्यांना टॉर्च दाखवीत मागे मागे चालत दरोडा पडला त्या घराच्या आजूबाजूला पोहचलो.कॉलनीतील जवळपास सगळे कर्मचारी बांधव हातात काठ्या घेऊन आले होते, नेमक्या कश्याला...???आजही याचं उत्तर काही सापडत नाही.बरे असो आमच्या पलीकडे साधारणतः ३० -३५ मीटर वर उजेडात आठ -दहा च्या संख्येत काही चोर उभे होते व ते आम्हांला त्यांच्या अलंकारिक भाषेत शिव्या देत होते. तर काही आमच्या दिशेने दगडं - गोटे फेकत होते पण आम्ही आंधारात आणि सुरक्षित अंतरावर उभे राहून तो तमाशा बघत होतो.घरातून निघताना बायको समोर मोठ्या शूर - वीर योध्याप्रमाणे बाहेर पडलेला एकही कर्मचारी समोर जाण्यासाठी तयार नव्हता.आम्ही कमी अधिक ३० - ४० जण तरी असतोल पण चोरांना दगड मारायला किंवा त्यांना हुसकावून लावण्यासाठी कोणी पुढं झालं नाही.ईकडच आम्ही आंधारात लपून उभे होतो, तेव्हढ्यात चोरांनी पळून जायला सुरुवात केली आमच्या दिशेने दगडं अजून जोरात फेकायला सुरुवात केली.का कोण जाणे आम्ही मागे फिरण्याचा पवित्रा घेतला आणि अचानक आमचे "काका" जोरात ओरडले , " अरे बाप्परे...!!! मायघाल्याणी ( आमच्या मराठवाड्यातील तोंडाळलेली शिवी ) मला दगडं मारला रे...!!! आणि ते खुप मोठ्यानी विव्हळायला लागले. अरुण नेमका त्यांच्या जवळच होता तो म्हणाला चला काका लाईट खाली जावून बघू. आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत खालच्या कॉलनीत लाईट खाली आलो , त्यांना चालता येत नव्हतं, माझ्या व अरुणच्या खांद्यावर रेलूण त्यांना आम्ही आणलं. त्यांना विचारलं की कुठं दगडं लागला तर ते म्हणाले पायाला , त्यांनी लुंगी वर केली आणि त्यांचा बुट काढला, मोजा काढला , पाय रक्त बन्बाळ झाला होता, खुप रक्त वाहत होतं मोठी जखम नेमकी डाव्या पायाच्या घोट्यावर झाली होती... त्यांच्याच पायमोज्याने त्यांची जखम बांधली आणि तेव्हढ्या रात्री पुन्हा चर्चेला उधाण आलं की ईतक्या अंधारात ३०- ४० माणसात नेमका "काका" च्याच पायाला चोट्यानं दगडं कसा मारला असलं...? ? ? तेव्हढ्यात अरुण म्हणला जाऊद्याराव दरोडा कसा पडला ते बघू नंतर पण चोरांमुळे आपल्याला काकांचा पाय तर दिसला...आणि सगळे जण लगेच हास्यकल्लोळात डुबले...😂🩸 _लॉक डावून मधे आपली व समाजाची काळजी घ्या...शक्येतो घरातच थांबा...प्रशासनाच्या प्रत्येक सुचनेला गांभीर्याने घ्याव...दररोज बातम्या पहा...हलगर्जीपणा व अतिशहाणेपणा अमेरिकेला कसा भोवलाय त्या पासुन धडा घ्यावा ही विनंती...सावध रहा...काळजी घ्या...धन्यवाद..._ 🩸🙏 मित्रानो , नमस्कार , पाच सहा वर्षा पूर्वी ( फुशारकी म्हणून नाही तर आमच्या मोबाईलला मराठी लिहिता येत नव्हत म्हणून ) ईंग्रजीत फेसबुक वर बरेच जीवन अनुभव लिहिलेत , त्या नंतर कधी वेळ मिळाला नाही , LOCK - DOWN ने आता मिळालाय आणि मोबाईलला आता मराठी लिहिता येत म्हणून पहिल्यांदा मराठीतून लिहितोय, चूक भूल क्षमस्व...आवडल्यास अभिप्राय कळवावा 🙏
टिप्पण्या